- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file pic
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद ते जयपूर आणि परत हैदराबाद दरम्यान सोळा साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे.
विशेष गाडी क्रमांक 07115 / 07116 असून, हैदराबाद-जयपूर हैदराबाद अशी ही विशेष गाडी धावणार आहे. सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मंदसौर, नीमच, चीतौरगढ, भिलवाडा, बिजैनगर, अजमेर आणि फुलेरा येथे गाडी थांबेल.
या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या असे डब्बे असतील,असे देखील सूत्रांनी सांगितले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने जरी केलेले गाडीचे वेळापत्रक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा