shooting-cycling-athletics-sports: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र अंतर्गतशुटिंग, सायकलींग व अँथलेटिक्स खेळांसाठी निवड चाचणी

                                         File photo

            



भारतीय अलंकार 24 

अकोला:  आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र (एक्सलन्स सेंटर) अंतर्गत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे अँथलेटिक्स, शुटींग व सायकलींग या खेळ प्रकाराचे राज्य निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.


खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटिंग,सायकलींग व अँथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणी दि. 30 व 31 मे रोजी घेण्यात येणार असून त्यासाठी खेळाडूंचे अर्ज मागविण्यात आले आहेत.


            


खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रा अंतर्गत अँथलेटिक्स - 18, सायकलींग- 14 व शुटींग- 24 खेळाडूंची निवड तज्ज्ञ समिती मार्फत घेऊन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाणार आहे.


निवड प्रक्रिया नियमावली 


1. सायकलींग व अँथलेटिक्स खेळाचे राज्य स्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तर सहभाग/प्राविण्य प्राप्त खेळाडूच निवड चाचणीसाठी पात्र असतील.


2.. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत प्रवेशाकरिता दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी परिशिष्ट-अ नुसार मानके निश्चित केलेली आहेत.


3. निकषानुसार  निवड चाचणीसाठी पात्र ठरत असलेल्या खेळाडुंनी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधुन परिशिष्ट-ब नुसार माहीती अर्ज 23 मे पर्यंत kiscepune@gmail.com या ई-मेल वर पाठवावेत. तसेच त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावी.


4. शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आवश्यकतेनुसार फक्त खेळाडूंची निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करण्यात यावा.


5. चाचणीस येताना खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत व मुळ प्रत सोबत आणावी.


6. चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी.


निकषानुसार  निवड चाचणीसाठी पात्र ठरत असलेल्या खेळाडुंनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे संपर्क साधावा अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली आहे.

टिप्पण्या