Policemen commits suicide in Akola: अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; दक्षता नगर पोलीस वसाहतीत खळबळ





नीलिमा शिंगणे जगड

अकोला:दक्षता नगर पोलीस वसाहत परिसरात राहणारे पोलिस कर्मचारी संजय सोळंके (ब. न. 822)  यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली. या घटनेमुळे अकोला पोलीस विभाग आणि दक्षता नगर पोलीस वसाहत मध्ये खळबळ उडाली आहे.  वरिष्टांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण समोर आले . सुसाईड नोट्समधे ठाणेदार व पोलीस दलातील बाबू जबाबदार आहे,असे लिहले असल्याचे कळते.


आज सोमवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास खदान पोलिस कर्मचाऱ्यांना निंबाच्या झाडाला आपल्या परिसरातील कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना लगेच दिली.



संजय सोळंके पोलीस वसाहतीमध्ये राहणारे असून,खदान पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहे. मृत्युसमयी त्यांचे वय अंदाजे 47 वर्ष असून अंगावर लाल निळ्या चौकडा असलेला सदरा परिधान केला असल्याची नोंद पंचनामा करताना पोलीसांनी घेतली आहे.




या घटनेची माहिती संपूर्ण पोलीस वसाहत मध्ये वाऱ्यासारखी पसरून, सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. खदान पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी पंचनामा केला असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


टिप्पण्या