Police Medal of Honor:Akola police: फुटबॉलपटू सलीम खान व लक्ष्मण सिरसाट 'पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक' चे मानकरी





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला पोलिस दलातील उल्लेखनिय सेवेसाठी राज्याच्या गृहविभाग कडून 'पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदक' जाहीर करण्यात आले होते. यामधील अकोला पोलीस दलातील दोघांना हे पदक महाराष्ट्र दिनाच्या पर्वाला सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.



महाराष्ट्र दिनाला महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना 2021 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक, यांचे सन्मानचिन्ह पदक बहाल करण्यात आले. 


दरम्यान, अकोला पोलीस मुख्यालय येथे कार्यरत  ASI सलीम अहमदखॉ महेमुद खान आणि लक्ष्मण काशीनाथ सिरसाट यांना 1मे रोजी झालेल्या सोहळयात जी. श्रीधर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह पदक प्रदान करण्यात आले. यावेळी अकोला पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अकोला पोलीस दलाला अभिमान वाटावा अशी कामगिरी सलीम खां आणि शिरसाट यांनी केली असल्याचे जी श्रीधर याप्रसंगी म्हणाले. 





सलीम खान हे पोलीस दलात कार्यरत आहेत.  खान हे उत्तम फुटबॉलपटू असून अनेक राष्ट्रिय, अखिल भारतीय व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा गाजविल्या आहेत. अकोला पोलीस दल फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पोलीस विभाग क्रीडा प्रमुख हे महत्वपूर्ण पद देखील उत्तमरीत्या सांभाळत आहेत.




टिप्पण्या