Shasti-Abhay-Yojana-property-tax: मनपाचा थकीत मालमत्ता कर वसुलीस चालना देण्याकरिता शास्ती अभय योजना कार्यान्वीत



अकोला: महानगरपालिका हद्दीत सन 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षात (कोव्‍हीड-19) कोरोना या विषाणूचा प्रादुर्भावामुळे सर्वसामान्‍य नागरिक, उद्योजक, व्‍यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्‍यामुळे ब-याच मालमत्‍ता धारकांना मालमत्‍ता कराचा वेळेवर भरणा करता आला नाही. महाराष्‍ट्र महानगरपलिका अधिनियम 1949 चे प्रकरण 8 कराधान नियम 41 (1) अन्‍वये थकीत कराच्‍या रक्‍कमेवर शास्‍ती आकारण्‍याची तरतुद आहे. त्‍या अनुषंगाने थकीत रक्‍कमेवर शास्‍ती (व्‍याज) लागले आहे. तसेच शास्‍तीसह संपुर्ण कराची वसुली करणे आवश्‍यक आहे. तथापी थकीत मालमत्‍ता कर वसुलीस चालना देण्‍याकरिता महाराष्‍ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे प्रकरण 8 कराधन नियम 51 अन्‍वये मनपा आयुक्‍त यांना प्राप्‍त अधिकारान्‍वये शास्‍ती अभय योजना सुरू करण्‍यात आली असल्याची माहिती अकोला म न पा ने दिली आहे.




*दि. 01/03/2022 ते दि. 31/03/22 या कालावधीत जे मालमत्‍ता धारक थकित व चालू संपुर्ण मालमत्‍ता कराचा भरणा एकरक्‍कमी करतील त्‍यांना शास्‍ती कराच्‍या रकमेत 50 टक्‍के सुट देण्‍यात येईत.


* दि. 01/04/2022 ते दि. 30/04/2022 या कालावधीत जे मालमत्‍ता धारक संपुर्ण कराचा एकरक्‍कमी भरणा करतील त्‍यांना शास्‍तीच्‍या रक्‍कमेत 25 टक्‍के सुट देण्‍यात येईल.


* ज्‍या मालमत्‍ता धारकांना दि. 01/03/2022 ते दि. 30/04/2022 या कालावधीत एकरक्‍कमी मालमत्‍ता  कराचा भरणा करणे शक्‍य नाही अशा मालमत्‍ता धारकांना अभय योजने अंतर्गत 3 हप्‍त्‍यात (Installment) देण्‍यात येत आहे या माध्‍यमातून थकित मालमत्‍ता धारकांना त्‍यांच्‍या कराचा भरणा करता येईल, भरणा केल्‍यानंतर उर्वरित राहीलेल्‍या रक्‍कमेवर शास्‍ती लागणार नाही. परंतू उपरोक्‍त प्रमाणे शास्‍ती अभय योजनेचा लाभ मिळणार नाही.


          

उपरोक्‍त कालावधीत थकीत कराचा संपुर्ण भरणा न करणा-या मालमत्‍तांची आकारीत शास्‍ती  वसुलीस दिलेली स्‍थगिती रद्द करून दि. 01/05/2022 पासून पुन्‍हा पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्‍यात येईल. तसेच संपुर्ण कराची शास्‍तीसह वसुली तथा महानगरपालिका अधिनियम 1949 चे कराधन नियम 8 कलम 42, 49 अन्‍वये जप्‍तीची व तत्‍सम कार्यवाही तात्‍काळ सुरू करण्‍यात येईल. थकीत मालमत्‍ता  धारकांनी याची नोंद घेउन शास्‍ती अभय योजनेचा जास्‍तीत जास्‍त लाभ घेउन आपला थकित मालमत्‍ता  कराचा भरणा  करावा,असे आवाहन अकोला मनपा ने केले आहे. 

टिप्पण्या