- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
maternal-condolences-minister-of- State-Bachchu-Kadu:राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक; श्रीमती इंदिराबाई कडू यांचे निधन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांचे दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात सहा मुलं व चार मुली, नातवंडं असा मोठा आप्तपरिवार आहे.
इंदिराबाई कडू राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री असून, गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू होते. आज दुपारी १२.४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
"माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई स्व. इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचा
अंत्यविधी १३-०३-२२ रविवार बेलोरा ता. चांदुर बाजार जि. अमरावती येथे सकाळी १० वाजता करण्यात येईल."
ना. बच्चू कडू
पालकमंत्री, अकोला जिल्हा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Bhavpurna Shardhanjali
उत्तर द्याहटवा