- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Prahar political party: prahar: प्रहार फ्रंटल आघाडी जिल्हाध्यक्ष जाहीर: हलवणे, साखरे, बुध, बाजड, काळणे यांची वर्णी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला :प्रहार जनशक्ती पार्टीच्या विविध आघाड्यांच्या जिल्हाध्यक्ष पदांची नावे गुरुवारी ना.बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष ऍड.सुधाकर खुमकर यांनी जाहीर केली.
जाहीर झालेल्या यादीत प्रहार विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी श्रीकांत हलवणे, अकोला महानगर अध्यक्षपदी सुज्ञेश साखरे, युवक आघाडी महानगर अध्यक्षपदी बिट्टू वाकोडे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी संजय बुध, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी शिल्पाताई बाजड, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पदी अतुल काळणे तर बाळापूर विधानसभा संपर्क प्रमुख पदावर डॉ.रोशन खंदारे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
फ्रंटलच्या नियुक्ती नंतर लवकरच प्रहार जनशक्ती पार्टीची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुधाकर खुमकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा