- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Omicron buldhana vidarbha: पश्चिम विदर्भात ओमायक्रॉनची एन्ट्री;दुबईवरून बुलडाण्यात आलेल्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
बुलडाणा: दुबई वरून बुलडाण्यात परतलेल्या 65 वर्षीय व्यक्तीची ओमायक्रॉन वेरीअंट चाचणी पॉझिटीव्ह आली असल्याने ओमायक्रोनने पश्चिम विदर्भात एन्ट्री केली आहे.
ओमायक्रोम पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी त्यांना एकुण 14 दिवस निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे संबंधीत व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटीव्ह असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे.
तहसीलदार रुपेश खंडारे9 डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हे व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. चार दिवसानंतर हा रिपोर्ट आज प्राप्त झाला आहे. तो पॉझिटीव्ह आला आहे.
बुलडाणेकरांना घाबरण्याची गरज नाही. कारण ओमायक्रॉनग्रस्त व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. 14 दिवसांच्या प्रोटोकॉलनंतर त्यांना सुटी देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा