Akola Bar Association: आमदार ॲडवोकेट किरण सरनाईक यांची अकोला बार असोसिएशनला सदिच्छा भेट व सत्कार समारंभ

MLA Advocate Kiran Saranaik's goodwill visit to Akola Bar Association and felicitation ceremony





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शिक्षक मतदार संघातील आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी  अकोला बार असोसिएशनला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने अकोला बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बार मधील सर्व वकील मंडळी उत्साहाने उपस्थित होते. 




आमदार किरणराव सरनाईक यांनी इतिहास घडविला



याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲड.मोतीसिंह मोहता यांनी म्हंटले की, आमदार किरण राव सरनाईक यांनी इतिहास घडविला आणि आमदार किरण सरनाईक हे वकिली व्यवसायाशी निगडित असल्यामुळे वकील संघासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. 





किरणराव सरनाईक यांचा सत्कार करताना अकोला बार असोशियनचे अध्यक्ष ॲडवोकेट राजेश जाधव यांनी आमदार एडवोकेट किरणराव सरनाईक यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. 



या सत्काराला उत्तर देताना आमदार  सरनाईक यांनी, मी मुळातच वकील असून आपल्या समस्यांना न्याय देण्यासाठी नेहमीसाठी आपल्या सोबत असल्याचे सांगत ते मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. 




या छोटेखानी कार्यक्रमाला अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अनुप देशमुख, महिला उपाध्यक्ष ॲड. संगीता भाकरे, ॲड.सौरभ शर्मा, ॲड.विनोद लोहिया, ॲड.धर्मेंद्र सरनाईक, ॲड. भिसे, ॲड. अनिस अहमद, ॲड.राजकुमार मंत्री, ॲड.राजदेरकर,ॲड झांबरे, ॲड. लखन बडदिया, ॲड.राजेश देशमुख,ॲड. राजनारायण मिश्रा आदी वकिल गण उपस्थित होते.



या कार्यक्रमाचे संचालन ॲड.धीरज शुक्ला यांनी केले. आभार ॲड.अनुप देशमुख यानी मानले, अशी माहिती धीरज शुक्ला यांनी दिली.



टिप्पण्या