independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळानीलिमा शिंगणे-जगड
अकोला: जिल्ह्यातील कुटासा येथे इको टुरिझम विकसित करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ गती द्यावी, असे निर्देश आज वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी ‘कुटासा इको टुरिझम’ होण्याबाबत आग्रह धरला आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून, लवकरच कुटासा या ऐतिहासिक ठिकाणाची पर्यटन वृद्धी होवून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मुंबई येथे आज मंत्रालयात भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कुटासा पर्यटन वृद्धी संदर्भात झालेल्या बैठकीस मिटकरी यांच्यासह वनविभागाचे उपसचिव गजेंद्र नरवने उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणाली द्वारे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, यवतमाळचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता आदी उपस्थित होते.
कुटासा ऐतिहासिक ठिकाण
कुटासा हे छोटेसे गाव अकोला शहर पासून जवळच आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण असून, पुरातन मिठागराच्या विहिरी येथे पहावयास मिळतात. ऐतिहासिक तलाव देखील या ठिकाणी आहे. हेमाडपंती वास्तू कलेचा उत्तम नमुना असलेले पुरातन मंदीर या गावी आहे. या ठिकाणाचा विकास झाल्यानंतर पर्यटनवृद्धी आणि तेथील स्थानिकांना निश्चितच रोजगार मिळणार आहे.
तलावातील गाळ काढणे, खोलीकरण, मिठागरांच्या विहीरीतून गाळ काढून पुनूरुज्जीवन करणे, मंदिर विकास या कामांचा विस्तृत कार्य अहवाल लवकरात लवकर मंजूर करावा, असे निर्देश देखील भरणे यांनी बैठकीत दिले आहेत.
या परिसरात वृक्ष आच्छादन चांगले असून वनाच्या वाढत्या विस्तारामुळे वन्यजीव शेतात येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यासाठी वनक्षेत्राला काटेरी कुंपण तात्काळ करावे, अशी मागणी यावेळी आमदार मिटकरी यांनी केली. यावर राज्यमंत्री भरणे यांनी माहिती घेऊन कुंपण करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता द्यावी, असे निर्देश दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा