Bigg Boss13: Balika Vadhu: Siddharth Shukla : बिग बॉस अन बालिका वधू फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Bigg Boss and Balika Vadhu fame actor Siddharth Shukla passes away




मुंबई : बिग बॉस सिजन 13 आणि बालिका वधू फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे आज निधन झाले. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असून, सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी दिली आहे.






सिद्धार्थने अभिनेता, होस्ट आणि मॉडेल म्हणून अल्पावधीतच यशस्वी झाला होता. हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.अजरामर अश्या भूमिका त्याने साकारल्या.  


अल्पावधीतच लोकप्रियता


'ब्रोकन बट ब्यूटीफुल 3', 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक' मधील भूमिकांमुळे चाहत्यांनी सिद्धार्थला हृदयात स्थान दिले आहे. बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअलिटी शोचा तो विजेता ठरला होता. सिद्धार्थने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले होते.  




डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना पराभूत करून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचे विजेतेपद त्याने पटकावले होते. 2008 च्या 'बाबुल का आंगन छुटे ना' या  मालिकेतील मुख्य भूमिकेतून सिध्दार्थने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2014 मध्ये सिद्धार्थने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटातुन मध्यवर्ती भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चंदेरी दुनियेत अल्पावधीतच सिद्धार्थने यशस्वीतेचा शिखर गाठला होता.

टिप्पण्या