Mumbai:anonymous phone calls: मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी फोनमुळे खळबळ

Sensation over anonymous phone calls that bombs were planted at four places in Mumbai (file photo)



मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भायखळा, दादर आणि  महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन सकाळी 9 वाजताच्या दरम्यान पोलिसांना आला. या फोन संदेशनंतर चारही ठिकाणी पोलिसांनी लगेच धाव घेतली. सध्या कसून तपासणी सुरू आहे.




ज्या फोन नंबरवरुन कॉल त्यावर पोलिसांनी लगेच संपर्क साधला. चौकशी केली असता "मला मिळालेली माहिती मी तुम्हाला दिली आहे", एवढेच उत्तर देवून त्या व्यक्तीने फोन स्विच ऑफ केला आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. हा फोन नेमका कुठून आला,त्या परिसरात जावून व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे. तसेच फोन संदेशा नुसार चारही ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.


निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने चार ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चारही ठिकाणी बॉम्बशोधक पथकही पाठविण्यात आले असल्याचे कळते.

टिप्पण्या