Home collapses in Balapur: बाळापुरात पावसामुळे घर कोसळले; नऊ वर्षीय बालकाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू






अकोला : बाळापूर शहरातील सतरंजीपुरा येथील घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत  9 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना घडली असल्याचे कळते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




प्राप्त माहितीनुसार, बाळापूर येथील शेख रसूल शेख रसूल हे आपल्या कुटुंब समवेत प्रमाणे घरात झोपले होते. शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक त्यांचे घर कोसळले. संपूर्ण कुटुंब भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.घर कोसळल्याचा आवाज ऐकून शेजारी राहत असलेले साजिद इकबाल अब्दुल रशीद धावून आले. आपल्या दोन भावांना सोबत घेऊन ते लगेच घटनास्थळी पोहोचले. यावेळी इतरही रहिवासी मदतीला धावून आले. ढिगाऱ्या खाली दबलेल्या परिवाराला त्यांनी बाहेर काढण्यात यश मिळवले. जखमींना बाळापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचा 9 वर्षीय मुलगा शेख कामरान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर चार जणांवर प्राथमिक उपचार करून रुग्णालयातून सुटी देण्यात आली.




शेख रसूल शेख वजीर यांची परिस्थिती हलाखीची असून मोलमजुरी करुन ते आपले कुटूंब चालवत होते. कालच्या पावसामुळे त्याचे विटा मातीचे घर पूर्ण कोसळले. लहान मुलाचा या घटनेत करुण अंत झाला. अशा परिस्थितीत शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टिप्पण्या