Crime news: बाळापूर नाका येथील युवकाचा अखेर पुर्णा पात्रात मृतदेह आढळला

                    मृतक सुरेश बचे



अकोला: एका युवकाने 27 जुलै रोजी म्हैसांग येथील पुलावरून पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.  या युवकाचा मृतदेह आज वळद नजीक पुर्णा पात्रात सापडला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, व संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला शोध कार्यात यश आले.




घटनाक्रम

सुरेश नारायण बचे रा.उमरी ता.दर्यापुर ह.मु.बाळापुर नाका अकोला वय (33) या युवकाने 27 जुलै रोजी म्हैसांग येथील पुलावरून पुर्ण नदीपात्रात आत्महत्या केली होती. आज सर्च ऑपरेशन दरम्यान वळद नजिक सुरेशचा मृतदेह आढळून आला. 



आजच्या सर्च ऑपरेशन मध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनात तलाठी सुनील कल्ले, तलाठी हरीहर निमकंडे आणि सहकारी तसेच मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे नितीन कोलटके, पंकज श्रीनाथ, तुळशिदास फुकट हे सहभागी होते.



यावेळी बोरगावचे ठाणेदार सोळंके, हे.काॅ. गोपनारायण विषेशतः लक्ष ठेवून होते. मृतकचे नातेवाईकही हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी भ्रमणध्वनीहुन दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या