corona update:vaccination:Akola सोमवार 5 जुलै रोजीचा लसीकरण कार्यक्रम: कोणते सेंटर सुरू राहील कोणते बंद जाणून घ्या

उद्या दिनांक 05/7/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


1)भरतीया हॉस्पिटल
 2)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
  3) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श नगर.)
4)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
5) लेडी हार्डिंग
6)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
7)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा क्रमांक 22 नंबर शाळा


वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield (* ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम तथा 50 द्वितीय) [ कूपन 50 प्रथम तथा 50 दितीय डोस ]साठी पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03   या वेळेत उपलब्ध राहील.
उपलब्ध आहे.

 
1)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
2)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
3)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी)
येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी *Covaxin* [ऑनलाईन अपॉइंटमेंट
50प्रथम तथा 50द्वितीय डोस]
  {कूपन 50प्रथम तथा 50द्वितीय डोस} पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.

ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

 *सूचना* :- आर के टी आयुर्वेदिक कॉलेज बंद राहील
*अकोला महानगरपालिका अकोला.*



                 *कोरोना अलर्ट*

आज रविवार दि. 4 जुलै 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

*प्राप्त अहवाल-362*
*पॉझिटीव्ह-4*
*निगेटीव्ह-358*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर चार+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी सहा = एकूण पॉझिटीव्ह-10

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात चार अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
अकोट-दोन, मुर्तिजापूर-एक, अकोला मनपा क्षेत्र- एक

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 13 असे एकूण 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-43093+14360+177= 57630*
*मयत-1128*
*डिस्चार्ज-56257*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-245* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या