- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
BJP: Randhir Savarkar: Akola: आमदार सावरकर ऍक्शन मोडवर; प्रभाग 8 च्या प्रमुख समस्यांसाठी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: येथील प्रभाग 8 मधील गुरुदत्त नगर, शांताबाई नगर, आश्रय नगरच्या परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येने त्रस्त झाले होते. त्याला अनुसरून आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी आज जनसंपर्क दौरा केला. यामध्ये ग्रामीणची विद्युत पुरवठा आता शहरी भागाला जोडण्याचे निर्देश त्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
शांताबाई भिरड ले आउट मधून आलेल्या नाल्यावर लवकरच नवीन सिमेंट पाइप टाकून रस्ता करण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले. तसेच आवश्कतेनुसार काही ठिकाणी मुरूम टाकण्याचे सुद्धा सांगितले. नळाचे दोन ठिकाणचे पाइप लाइन कनेक्शन त्वरित जोडून द्यावे. आदींसह नागरिकांच्या समस्यांवर आपल्या खास अभ्यासू, आक्रमक शैलीत जलद निपटारा केला.
यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दमदार आमदार रणधीरभाऊ सावरकर यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक तुषार भिरड, रंजना विंचणकर, शिवा हिंगणे, जयंत मसने, माधव मानकर, निलेश नीनोरे, वसंता मानकर, विलास शेळके, श्याम विंचणकर, बबलू सावंत, पद्माकर मोरे, डॉक्टर सुभाष लव्हाळे, अनिल गरड, सुरज शेळके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मनपा, वीज वितरण कंपनी, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग अधिकार्यांची त्यांनी समस्या संबंधित संपर्क साधून समस्या निराकरण निराकरण करण्याचे आदेश दिले व जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची आदेश दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा