- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील रहिवासी शिवाजी गणेश मापे (वय 40) व त्याचा भाऊ हरिदास गणेश मापे (वय 35) या दोघा भावामधे बाचाबाची झाली. या वादात लहान भाऊ हरिदास गणेश मापे याने चाकुने शिवाजी गणेश मापे यांचे छातीवर सपासप वार करून जीवे मारून टाकल्याची घटना उघडकीस आली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली.
घरगुती बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. रागाच्या भरात अघटित घडले. कुणीही मधात येऊ नये म्हणून हरिदास चाकु घेऊन उभा होता. तर खुपसून देईन असे धमकावत होता. त्यामुळे कुणीही भांडणाचा मधात पडले नाही. आणि काही कळायच्या आतच एका भावाने आपल्या भावाला यमसदनी धाडले.
दरम्यान, गावातील नागरिकांनी हिवरखेड पोलिस स्टेशन मध्ये फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले. संशयित आरोपी आपल्या पत्नीला व मुलांना घेऊन मोटरसायकल ने जात असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात दिली. भांडणाचे मुळ कारण अद्याप समोर आलेले नाही . पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा