Pune Fire: Mulshi:पुण्यात पुन्हा अग्नितांडव; सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग, १७ जणांचा मृत्यू




पुणे: येथील मुळशी तालुक्यातील पिरंगुट MIDC परीसरात एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यात संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे कारखान्यात अडकलेल्या १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.




यामध्ये १५ महिला आणि २ पुरुुष कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक कर्मचारी  बेपत्ता असल्याचे कळते. सध्या कारखाना मधून निघत असलेला काळा धुर आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे.तर कारखान्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.




दरम्यान अग्निशमन दल,पोलीस दल तसेच नागरिक, कारखानाचा अन्य स्टाफ परिस्थिती वर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत. तसेच लोकप्रतिनिधी घटनास्थळी मदतीसाठी व पाहणीसाठी धाव घेत आहेत. वृत्त लिहिस्तोवर घटनेचे नेमके कारण समोर आले नाही.तसेच या दुर्दैवी घटनेत किती आर्थिक व जीवित हानी किती झाली याची निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. 

टिप्पण्या