Murder : अगबाई...सुनबाई...सासूबाईचा केलास घात! कुरबुर गेली विकोपाला सुनेने विळाने केला वार,सासू जागीच झाली गतप्राण


   


भुसावळ:(जळगाव): सासूच्या डोक्यात व पाठीवर सुनेने विळयाने वार करुन तिची हत्या  केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास प.क.कोटेचा विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकरणी सून उज्ज्वला सोनवणे ( ३८ ) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे ( ७५ ) असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे . 





प्राप्त  माहितीनुसार, रवींद्र सोनवणे हे कोटेचा विद्यालयात सुरक्षा रक्षक आहेत . शाळेच्या परिसरात ते आई आणि पत्नी उज्ज्वला यांच्यासह वास्तव्यास आहेत. सकाळच्या सुमारास रवींद्र हा काही साहित्य घेण्यासाठी गावात गेला होता . त्याचवेळी द्वारकाबाई व सून उज्ज्वला यांच्यात कुरबुर सुरू झाली. हा वाद  एवढ्या विकोपाला गेला की, रागाच्या भरात सूनेने धारदार विळ्याने सासूच्या मान, डोके व पाठीवर जोरदार वार केले. 





अचानक झालेल्या या हल्ल्यात सासू द्वारकाबाई जागीच ठार झाल्या. काही वेळाने रवींद्र घरी परतला. त्याला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर रवींद्र हा ओळखीच्या एका नगरसेवकाकडे गेला. नगरसेवकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी  घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.



टिप्पण्या