corona update: Akola: आज दिवसभरात सहा जणांचा मृत्यू;एकूण पॉझिटीव्ह-120, तर 454 जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*


आज शनिवार दि. 5 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

*प्राप्त अहवाल-1060*
*पॉझिटीव्ह-84*
*निगेटीव्ह-976*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह-* आरटीपीसीआर 84+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 36 = एकूण पॉझिटीव्ह-120

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 84 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 31 महिला व 53 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-दोन, अकोट-27, बाळापूर-नऊ, बार्शीटाकळी- दोन, पातूर-तीन, तेल्हारा-सात अकोला-34. (अकोला ग्रामीण-17, अकोला मनपा क्षेत्र-17)



आज दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात,
अकोली जहागीर ता.अकोट येथील 47 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 मे रोजी दाखल केले होते.
आलेगाव ता. पातूर येथील 47 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 3 जून रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 45 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 30 मे रोजी दाखल केले होते.
उमरा ता. पातूर येथील 73 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 26 मे रोजी दाखल केले होते.
कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 जून रोजी दाखल केले होते.
80 वर्षीय अज्ञात पुरुष असून या रुग्णास दि. 4 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 19, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील पाच, समर्पण हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, फतेमा हॉस्पीटल येथील  एक, डॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 454 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42418+13916+177= 56511*
*मयत-1101*
*डिस्चार्ज-52374*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-3036*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या