corona update: अकोला: आज एकूण पॉझिटीव्ह- ५९९; अकरा जणांच्या मृत्यूची नोंद , ४४६ जणांना डिस्चार्ज

            *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २ मे २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-१८२०*
*पॉझिटीव्ह-३७६*
*निगेटीव्ह-१४४४*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३७६+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २२३= एकूण पॉझिटीव्ह- ५९९



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ३७६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५३ महिला व २२३ पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-३९, अकोट-३३, बाळापूर-३७, तेल्हारा-चार, बार्शी टाकळी-१६, पातूर-२५, अकोला-२२२. (अकोला ग्रामीण-३६, अकोला मनपा क्षेत्र-१८६)



आज दिवसभरात ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात शिवसेना वसाहत येथील ८० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य जठारपेठ येथील ८५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, आगर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, हिंगणा म्हैसपूर येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर भारती प्लॉट येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवार येथील ६४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते. गांधीग्राम येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. रोहणा अकोला येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज तिघांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यात मलकापूर येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य मुर्तिजापूर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील ३० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसर हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील १०, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील पाच, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, समाज कल्याण वसतीगृह येथील सहा, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ३६५ असे एकूण ४४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३१८३९+९३०६+१७७= ४१३२२*
*मयत-७१३*
*डिस्चार्ज-३५०८५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५५२४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या