corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-६९४; सहा जणांच्या मृत्यूची नोंद, ४०३ जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*


*आज बुधवार दि. ५ मे २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- २५८५*
*पॉझिटीव्ह-४८९*
*निगेटीव्ह-२०९६*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ४८९+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २०५= एकूण पॉझिटीव्ह-६९४



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ४८९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८४ महिला व ३०५ पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-३८, अकोट-७४, बाळापूर-३४, तेल्हारा-चार, बार्शी टाकळी-१३, पातूर-८७, अकोला-२३९. (अकोला ग्रामीण-७५, अकोला मनपा क्षेत्र-१६४)



आज दिवसभरात सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बाळापूर येथील ७० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ३ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य गोरक्षण रोड येथील ७९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, खोलेश्वर येथील ७० वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते. अकोला फैल  येथील ६२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ४ मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर  देऊळगाव ता. पातूर येथील ६४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २२, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक,  कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी दोन, केअर हॉस्पीटल येथील एक,युनिक हॉस्पीटल येथील एक, आगर हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा कर्मचारी भवन येथील एक, समाज कल्याण वसतीगृह येथील सहा, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, तर होम आयसोलेशन मधील ३४५ असे एकूण ४०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३३०६८+९८७६+१७७= ४३१२१*
*मयत-७४३*
*डिस्चार्ज-३६४०१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५९७७*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)



*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या