corona update: Akola: आज दिवसभरात १८ जणांच्या मृत्यूची नोंद; ३८७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, ४३८ जणांना डिस्चार्ज

              *कोरोना अलर्ट*




*आज सोमवार दि. ३ मे २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १३२०*
*पॉझिटीव्ह-२५६*
*निगेटीव्ह-१०६४*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २५६+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १३१= एकूण पॉझिटीव्ह-३८७



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात २५६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९५ महिला व १६१ पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-३८, अकोट-२७, बाळापूर-चार, तेल्हारा-२५, बार्शी टाकळी-चार, पातूर-३८, अकोला-१२०. (अकोला ग्रामीण-२०, अकोला मनपा क्षेत्र-१००)



आज दिवसभरात १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात जनूना ता.बार्शीटाकळी येथील ४८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य सिटी कोतवाली येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, वनी रंभापूर येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि.२६ रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील २७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते. संतोष नगर  येथील ५३ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील ५० वर्षीय महिला  असून या रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच हातगाव ता.मुर्तिजापूर येथील ७१ वर्षीय महिला रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते,म्हैसपूर येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. दहिहांडा येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजारी येथील ५० वर्षीय महिला  रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, रोहणा येथील २७ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, सांगळूद येथील ६५ वर्षीय महिला रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, मातोडी येथील ४८ वर्षीय महिला रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, विवरा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णास दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते,कोठारी लेआऊट येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला मृतावस्थेत दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात  डाबकी रोड येथील १९ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य अकोट येथील २६ वर्षीय महिला असून त्याना दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८, आरकेटी महाविद्यालय येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट  येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील दोन, इन्फीनिटी हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन  हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फातिमा हॉस्पीटल येथील दोन, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल येथील नऊ, स्कायलार्क हॉटेल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, समाज कल्याण वसतीगृह येथील दोन, लोहाणा केअर सेंटर येथील तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ३३० असे एकूण ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३२०९५+९४३७+१७७= ४१७०९*
*मयत-७३१*
*डिस्चार्ज-३५५२३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५४५५*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)



*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या