corona update: Akola: आज दिवसभरात 22 जणांच्या मृत्यूची नोंद; एकूण पॉझिटीव्ह- 523, तर 550 जणांना डिस्चार्ज

              *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. 8 मे २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-2345*
*पॉझिटीव्ह-379*
*निगेटीव्ह-1966*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 379+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 144= एकूण पॉझिटीव्ह- 523



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 379 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 133 महिला व 246 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-33, अकोट-37, बाळापूर-34, तेल्हारा-14, बार्शी टाकळी-17, पातूर-34, अकोला-210. (अकोला ग्रामीण-88, अकोला मनपा क्षेत्र-122)


आज दिवसभरात 22 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कौलखेड येथील 66 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 24 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खडकी येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील 61 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 2 मे रोजी दाखल करण्यात आले होते,  अकोट येथील 66 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अपोती बु. येथील 30 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 81 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते. खदान येथील 72 वर्षीय पुरुष  असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते. कैलास टेकडी येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. रणपिसे नगर येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 28 रोजी दाखल करण्यात आले होते, तर चोहट्टा बाजार ता.अकोट येथील 65 वर्षीय महिला रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते, गाडगे नगर येथील 42 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते.कान्हेरी येथील 50 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. लहान उमरी येथील 77 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 20 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, रेणूका नगर येथील 78 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 रोजी दाखल करण्यात आले होते, लहरिया नगर येथील 47 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, पारस ता. बाळापूर येथील 63 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 24 रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच माता नगर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, गुलजारपुरा येथील 42 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तर दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात जिल्हा परिषद कॉलनी येथील 72 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते, कोतवाल सिटीजवळ येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 58, युनिक हॉस्पीटल येथील सात, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसारे हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुगणालय चार, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फतेमा हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील चार, काले हॉस्पीटल येथील दोन, सोनोने हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 440 असे एकूण 550 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-34486+10375+177= 45038*
*मयत-787*
*डिस्चार्ज-37898*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6353*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या