corona update: एकूण पॉझिटीव्ह- 476; अठरा जणांच्या मृत्यूची नोंद,575 जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*


*आज सोमवार दि. 10 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1622*
*पॉझिटीव्ह-309*
*निगेटीव्ह-1313*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 309+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 167= एकूण पॉझिटीव्ह- 476



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 309 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 118 महिला व 191 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-32, अकोट-19, बाळापूर-नऊ, तेल्हारा-30, बार्शी टाकळी-आठ, पातूर-आठ, अकोला-203. (अकोला ग्रामीण-99, अकोला मनपा क्षेत्र-104)




आज दिवसभरात 18 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कौलखेड येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य दहिहांडा येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 73 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते,  दहिहांडा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर अंबोदा ता.अकोट येथील 74 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, मुंडगाव ता.अकोट येथील 46 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते. वर्धमान नगर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते. नंदखेड ता. अकोट येथील 74 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. आश्रय नगर येथील 96 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 2 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 49 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 7 रोजी  दाखल करण्यात आले होते, शरद नगर येथील 49 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, कापसी ता. पातूर येथील 74 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते, अजनी ता.बार्शीटाकळी येथील 36 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, बापूनगर अकोट फैल येथील 38 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, हरिहर पेठ येथील 80 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, तापडीया नगर येथील 46 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील 41 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 32, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, समाज कल्याण वसतीगृह येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील 18, केअर हॉस्पीटल येथील सहा, आयकॉन हॉस्पीटल येथील 10, लोहना हॉस्पीटल येथील एक, जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील तीन, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील 15, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील तीन, देशमुख हॉस्पीटल येथील एक,  फातिमा हॉस्पीटल येथील एक, अर्थव  हॉस्पीटल येथील चार, काळे हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील एक तर होम आयसोलेशन मधील 435 असे एकूण 575 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-35345+10754+177= 46276*
*मयत-817*
*डिस्चार्ज-39012*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6447*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या