breaking news: Yashomati Thakur: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची अकोल्यात पत्रकारांशी अरेरावी




भारतीय अलंकार24

अकोला : महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचा आज विविध विषयासाठी जिल्हा दौरा आयोजित होता. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकी नंतर पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला ठाकूर उशिरा आल्या. मात्र, त्यानंतरही त्यांनी  पत्रकारांसोबत दादागिरी केली. 




जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकार घडला. पत्रकार परिषदेला बोलावल्यावरही वेळेवर न येवूनही ठाकूर यांची पत्रकारांसोबत अरेरावीची भाषा वापरली. यावेळी चित्रीकरण करणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचा कॅमेरा ही त्यांनी हिसकावला. सोबतच अकोल्याबद्दल अनुद्गार काढले. या घटनेचा अकोला   जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनेने निषेध नोंदवीला आहे.




टिप्पण्या