Bengal Election result live: प.बंगालमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष!

Bengal Election result live: All eyes are on who will win in West Bengal! (File image)




पश्चिम बंगाल: पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या ट्रेन्ड्स मध्ये एक्झिट पोल मध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तृणमूल काँग्रेस काही जागांनी पुढे आहे. 




एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ममता बॅनर्जी सत्ता कायम राखणार असल्याचे चित्र दिसत आहे.  294 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. या 148 जागांचे लक्ष्य तृणमूल काँग्रेस गाठू शकेल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपची सत्ता येथे यावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सर्व ताकद लावली आहे. आता पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





टिप्पण्या