flyover:worker dies: दुर्दैवी घटना: उड्डाणपुलाचे कामावर मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू ; तीन किरकोळ जखमी

Worker dies after being crushed under a mound of work on a flyover



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: बाळापूर रोडवर निर्माणधीन उड्डाणपुलाचे काम सुरु असताना गड्ड्यात काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर मातीचे ढिगारे कोसळले. यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी झाले तर राकेश गोंड (रा.बिहार वय 37) या मजूराचा जागीच  मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.



अकोला ते वाशिम रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मोंटेकार्लो कंपनीकडे या रस्ता बांधकाम कंत्राट आहे. या कंपनीच्या कामगाराचा आज कामावर असताना ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. 




घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली. किरकोळ जखमी व मृत्यू पावलेल्या मजुरास कंपनीने कायदेशीर रित्या नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अन्य मजुरांनी केली आहे.





टिप्पण्या