corona update:Akola: आज दिवसभरात २४२ पॉझिटीव्ह; २ मयत

              *कोरोना अलर्ट* 

*आज शुक्रवार दि. १९  फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,* 

*प्राप्त अहवाल-७५४*
*पॉझिटीव्ह- २४२*
*निगेटीव्ह-५१२*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३४ महिला  व ५१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील १९, जठारपेठ येथील आठ, आदर्श कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, कौलखेड व माधव नगर येथील प्रत्येकी तीन जण, गड्डम प्लॉट,  वाशीम बायपास,  कॉग्रेस नगर, जलतारे प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  रिंगरोड, मोमिनपुरा,  मोरेश्वर कॉलनी, तुकाराम चौक,  बायपास रोड,  मोहारी, सातव चौक,  रतनलाल प्लॉट,  मनकर्णा प्लॉट,  कास्तकार भवन,  रजपुतपुरा,  रेणुकानगर, लहान उमरी, अमान खॉ प्लॉट, लक्ष्मी नगर, मोठी उमरी,  उमरी नाका,  चेलका ता. बार्शी टाकळी,  आनंद नगर, डाबकी रोड,  चोहोट्टाबाजार,  सिंधी कॅम्प, कीर्ती नगर, जुने शहर,  रामनगर,  सीएस ऑफिस,  चतुर्भुज कॉलनी, उगवा, वडाळी देशमुख, केळीवेळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 



दरम्यान आज दुपारनंतर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुर्तिजापूर येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.  तर अन्य हरिहरपेठ अकोला येथील ७३ वर्षी पुरुष रुग्ण असून या रुग्णासही दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १८, आयकॉन हॉस्पिटल मधुन पाच, स्कायलार्क हॉटेल येथून चार, बिहाडे हॉस्पिटल मधुन तीन,  सुर्यचंद्र हॉस्पिटल मधुन एक, ओझोन हॉस्पिटल मधुन दोन, तर होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या चार जणांना अशा एकूण ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१०९६२+२२५४+१७७=१३३९३*
*मयत-३४८*
*डिस्चार्ज-११४२१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१६२४* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार) 

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या