corona update: अकोला: आज पॉझिटीव्ह-१२९; मयत २

          *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ६८९*  
*पॉझिटीव्ह-१२९*
*निगेटीव्ह-५६०*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १२९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४३ महिला व ८६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील १८, बाबुळगाव येथील १६, लोहारा येथील १३, गोरक्षण रोड येथील ११, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व कंजरा येथील प्रत्येकी चार, मलकापूर, खिरपूरी बु. व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, अयोध्या नगर, तापडीया नगर, दातवी, सहकार नगर, कौलखेड व कोठारी बु. येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गणेशनगर, खदान, कलेक्टर ऑफिस, केशव नगर, खडकी, हिंगणा रोड, जीएमसी हॉस्टेल, केळीवेळी, सातव चौक, जूने शहर, रणपिसे नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, गाडगे नगर, सिंधी कॅम्प, जठारपेठ, वडद, बोरगाव मंजू, मनारखेड, आगर, पातूर, हिंगणा उमरा, पिंपरी अडगाव, सुधीर कॉलनी, बीअँडसी क्वॉटर, पाचगणी ता.पातूर, मोठी उमरी, अकबर प्लॉट, निभोंरा, बार्शीटाकळी, बोरगाव वैराळे व दहिहांडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात सिद्धार्थवाडी, नायगाव अकोला येथील रहिवासी असलेल्या ६१  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य माऊलीनगर, खडकी येथील ७४ वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात २७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११७२७+२३९३+१७७=१४२९७*
*मयत-३५७*
*डिस्चार्ज-११६३१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२३०९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या