Corona update: अमरावती विभागात कोरोनाचा उद्रेक: पाच जिल्ह्यासाठी नवी नियमावली जाहीर





भारतीय अलंकार

अकोला: सध्या परीस्थितीत अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून, सीमा निश्चित करण्यात आल्या. या क्षेत्रात (Contalinment Zone) प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे,असे स्वतंत्र निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना आज रविवारी दिले आहेत. 


अमरावती विभागातील कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्याने शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागासाठी खालीलप्रमाणे सुधारित निर्देश देण्यात येत आहेत.


१. सर्व प्रकारची दुकाने आस्थापना  सकाळी १.०० ते सायं. ५.०० वा. पर्यत सुरु राहतील.


२. महानगरपालीका, नगरपालीका क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील


३. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC, अन्न व नागरी पुरवठा, FCI, N.Y.K., महानगरपालीका बैंका वगळून) हया १५% किंवा ११ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल तो ग्राहय धरुन सुरु राहतील.


४. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना हया एकूण ५% किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती  सुरु राहतील,


५. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवास करन खरेदी करणे टाळावे. 


६. सर्व प्रकारची उपहारगृहे/हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधास परवानगी राहील. 


७. लग्नसमारंभाकरीता २५ व्यक्तीना (वधू व वरासह) परवानगी अनुज्ञेय राहील


८. संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रीका तपासणे, निकाल घोषित करणे इ. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.


९. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूक साठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. 


१०. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतुक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालका व्यतीरिक्त इतर प्रवासी अनुज्ञेय राहतील, तीन चाकीगाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतीरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेलमेट व मास्क सह २ प्रवासी यांना परवानगी राहील.


११. आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या १०% प्रवाशी सह सोशल डिस्टंसिंग व निजतुकीकरण करून वाहतूकीकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांनी नियोजन करावे.


१२. सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तीपर्यंत मर्यादीत स्वरुपात नागरिकांसाठी सुरु राहतील. १३. ठोक भाजीमंडई सकाळी 10 ते ८ या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील.


१४. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस,  बंद राहतील.


१५. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाटयगृहे. प्रेक्षकगृहे, व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील. 


१६. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन या कालावधीत बंद राहतील.


यापुढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९.०० ते सायं. ५.०० पर्यंत सुरु राहतील. आठवडयाअखेर शनिवारी सायंकाळी ५.०० ते सोमवारी सकाळी ७.०० पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. आठवडा अखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुग्धविक्रेते/डेअरी यांची दुकाने ही यापुढे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत (आठवडयाचे ७ ही दिवस) नियमितपणे सुरु राहतील. सद्यस्थितीमध्ये Mission Begin Again अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती ती रह करुन, उपरोक्तप्रमाणे निर्बध १ मार्च रोजी सकाळी ८.०० वा. पर्यंत घालण्यात येत आहेत.




आपल्या जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता योग्य ते आदेश तातडीने निर्गमित करावा,असे या आदेशात म्हंटले आहे.





टिप्पण्या