corona update: अकोला: आज ६५ पॉझिटीव्ह

                *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- ४२६*  
*पॉझिटीव्ह-६५*
*निगेटीव्ह-३६१*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २६ महिला व ३९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  गोरक्षण रोड येथील आठ,  मुर्तिजापूर येथील सहा, अकोट येथील पाच, मोठी उमरी, न्यु तापडीया नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, बार्शीटाकळी, कौलखेड, बाळापूर, पातूर, सिंधी कॅम्प, आयडीबीआय बँकसमोर, गड्डम प्लॉट व बाळापूर नाका येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मांजरी, आदर्श कॉलनी, गोकूल नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएमसी कर्मचारी, डाबकी रोड, जठारपेठ, कुंभारी, म्हातोडी, गुरुदेव नगर, अंबिका नगर, हिवरखेड, मलकापूर, गीता नगर, माना, कुरुम ता.मुर्तिजापूर, कांजरा ता.मुर्तिजापूर, परिवार कॉलनी, रणपिसे नगर, जीएमसी व अडगाव खुर्द ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ९७७६+२१०८+१७७=१२०६१*
*मयत-३४१*
*डिस्चार्ज-१०९३१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७८९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या