Road accident: पुन्हा दुचाकीची समोरासमोर धडक: ३ गंभीर; अल्पवयीन वाहन चालकांकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

                                प्रतिकात्मक चित्र




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मूर्तिजापूर येथून १० किलोमीटर असलेल्या मोहखेड फाटा जवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ३ जण  गंभीर जखमी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान घडली. यातील दोघे अल्पवयीन मुले आहेत.



कानडी बाजार येथील  रवी केशव जाधव (३५) हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बीके ९१७५ ने आईला घेऊन मूर्तिजापूर येथे कामानिमित्त येत होता तर राहील अब्दुल रशीद (१५) व अल्तमस अब्दुल रशीद (१३) दोघेही राहणार धोत्रा (शिंदे) हे दोघे अल्पवयीन भाऊ  दुचाकीने मूर्तिजापूर कडून आपल्या गावी धोत्रा येथे जात असताना दोन्ही दुचाकीची मूर्तिजापूर - पिंजर रोडवर मोहखेड फाट्या दरम्यान,  जोरदार धडक झाली यात यात रवि केशव जाधव राहणार कानडी बाजार, अल्तमस अब्दुल रशीद, राहील अब्दुल रशीद हे तीघे जण गंभीर जखमी झाले.  



दुसरी घटना

१९ डिसेंबर रोजी अशाच अपघातात सैय्यद अजीम सैय्यद निसार (२५) राहणार पातूर नंदापूर हा घटनास्थळीच ठार झाला गत दोन दिवसात दुचाकीची समोरासमोर धडक होण्याची याच रोडवर सोमवारी दुसरी घटना घडली. गंभीर जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींना गंभीर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. 



वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

अल्पवयीन मुले वाहतूक पोलिसांच्या समोरून सुसाट वाहने चालवितात,तरी देखील याकडे दुर्लक्ष केल्या जाते. केवळ कागदोपत्री नियम घालून देण्यात येतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने महामार्गावर देखील अल्पवयीन मुले गाडी चालविण्याचे धाडस करतात.पालकांनी आणि पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

टिप्पण्या