Akola police: जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचा अकोट शहरात धडाका; ८५ वाहनांवर केली कारवाई

Akola District Traffic police Branch's action in Akot city, action on 85 vehicles




भारतीय अलंकार

अकोला: जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशानूसार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह अचानक अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या रोडवर कारवाई सुरू करून ८५ वाहनांवर दंडात्मक कारवाई  केली.



वाहन धारकात खळबळ


या धडक कारवाईमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकात एकच खळबळ उडाली आहे. बऱ्याच वेळ अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या अकोट ते हिवरखेड, अकोट ते दर्यापूर व अकोट ते अंजनगाव या मार्गावर शांतता पसरली होती. 



वाहन जमा


मोहिमेवर पोलीस निरीक्षक गजानन शेळके स्वतः लक्ष ठेवून होते. या कारवाई मध्ये  क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणारी एकूण १७ वाहने, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या ३८ व इतर ३० अश्या एकूण ८५ वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली. ज्या प्रवासी वाहन चालकांकडे वैध कागदपत्रे नव्हती, अशी वाहने पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली.

टिप्पण्या