Sport news: खेलो इंडिया अंतर्गत ई- खेलो पाठशाला

महाराष्ट्र राज्य हे देशातील फिटेस्ट स्टेट ठरविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे.



भारतीय अलंकार

अकोला: जानेवारी २०२० मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने दुसऱ्या वर्षीही देशात अजिंक्यपद प्राप्त करुन राज्याला लौकीक मिळवून दिला. यासाठी आता फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत खेलो इंडिया फिटनेस असेसमेंट फॉर स्कुल, गोईंग चिल्ड्रेन हा उपक्रम राज्यात प्रारंभ केला आहे. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा प्रमाणेच फिट इंडिया मुव्हमेंट, मध्येही महाराष्ट्र राज्य हे देशातील फिटेस्ट स्टेट ठरविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे.


फिट इंडिया मूव्हमेंट या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संचालक, शिक्षण विभाग व राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे स्तरावरुन सर्व जिल्हयांना पत्र देवुन राज्यातील शाळांची ऑनलाईन नोंदणीची कार्यवाही पुर्ण करण्या बाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.


डायरेक्टर जनरल, स्पोर्टस ऍ़थोरिटी ऑफ इंडिया यांचे पत्रान्वये आपल्या देशातील खेळाची संस्कृती वाढविण्याकरीता क्रीडा शिक्षकांचे व क्रीडा मार्गदर्शक यांचे खेलो इंडिया अंतर्गत विविध खेळाची ई पाठशाला ऑनलाईन प्रशिक्षणाची सुरवात करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.


या उपक्रमाध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.


खेलो इंडिया ई-खेलो पाठशाला हा शारीरिक शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक  यांचेसाठी ई शिक्षण पाठशाला मंच तयार करण्यात आला आहे.


यामध्ये शारीरिक व डिजिटल सोबत मुलांना, खेळाडुंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


याशिवाय क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक यांना यातील योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण साठी त्या त्या विभागातील तज्ञ देऊन त्यांचे वेळोवेळी मूल्यमापन करण्यात येणार आहे.


या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांचा समावेश मोठया प्रमाणात होण्यासाठी जिल्हयातील सर्व शाळांनी खेलो इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शाळा व क्रीडा शिक्षक यांची नोंदणीची कार्यवाही करावी, असे आवाहन  अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.



टिप्पण्या