Sameer Wankhede: NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गोरेगावात हल्ला;३ हल्लेखोर ताब्यात

कैरी मेंडिसला पकडून एनसीबी कार्यालयात आणले

                                  फोटो:ट्विटर




मुंबई:  गोरेगाव येथे NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काल हल्ला झाला. ड्रग्ज पेडलर्सकडून हा हल्ला झाल्याचे कळते. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली असल्याची माहिती ANI ने दिली आहे. 


                                          ट्विटर



समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. मनोरंजन क्षेत्रातील ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केले असल्याने हा हल्ला झाला असावा,असा कयास लावला जात आहे.


समीर वानखेडे व त्यांचे पाच सहकारी  ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिस याला पकडण्यास गेले होते. कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी कार्यालयात आणले. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.



एनसीबीने कॉमेडियन भारती व तिचा पती हर्ष या दोघांना परवा अटक केली. त्याआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल, रिया चक्रवर्तीला यांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे.


टिप्पण्या