Religious: धार्मिक:भजन किर्तनाला रितसर परवानगी द्यावी -वारकरी सेना

अन्यथा, २ डिसेंबरपासून  जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण



भारतीय अलंकार

अकोला: महाराष्ट्रातील देवस्थान खुली केल्यानंतर आता धार्मिक कार्यक्रमाला सुध्दा रितसर परवानगी देण्यात येवून १०० लोकांना यात सहभागाची मंजुरी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन विश्व वारकरी सेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. मागणी त्वरित मंजूर करावी, अन्यथा २ डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येईल, अशी चेतावणी वारकऱ्यांनी यावेळी दिली.



मंदिर उघडल्या नंतर सुद्धा गावोगावी धार्मिक सप्ताह साजरे करण्यास पोलीस स्टेशन मधून रितसर परवानगी मिळत नाही. यामुळे वारकरी संप्रदायमध्ये सरकार विषयी नाराजीचा सूर दिसून येत आहे.


महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताह पोलीसांची परवानगी न घेता चालू आहेत. पण सप्ताह नियोजन करीत असताना काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पोलीस कार्यवाहीची भीती सुद्धा आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.



कोरोना काळात ८ महिन्यापासून कथा कीर्तन बंद असल्यामुळे वारकरी संप्रदायातील गायक, वादक आणि परिस्थितीने सर्वसामान्य असलेली कीर्तनकार मंडळी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. कथा, कीर्तन, गायन, वादन करणे हा आमचा वारकऱ्यांचा व्यवसाय नसून, एक साधना आहे. पण कथा कीर्तन गायन वादन केल्यानंतर सप्ताह कमिटी स्वइच्छेने जे मानधन देतात,  त्या मानधनामध्ये प्रपंचही चालतो. परमार्थही  होतो. म्हणून  जर लग्नाला १०० लोकाना परवानगी देत आहात तर धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा नियम अटी लावून परवानगी देण्यात यावी. वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय संप्रदाय असून, दिलेल्या नियमांचे कुठेही उल्लंघन करणार नाही, अशी ग्वाही देतो. म्हणून लवकरात लवकर महाराष्ट्रातील गावागावात धार्मिक कार्यक्रमाला रितसर परवानगी द्यावी. अन्यथा, २ डिसेंबरला अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि या आमरण उपोषणाला फक्त धार्मिक संघटनांचा समावेश असून कोणत्याही राजकीय पक्षाचा  पाठींबा स्वीकारणार नाही. म्हणून वारकऱ्याना उपोषणास बसण्याची वेळ येवू न देता धार्मिक कार्यक्रमाला लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी अकोला आणि जिल्हा पोलीस अधीक्षक  अकोला  यांना दिले आहे.


                                                       यावेळी हभप गणेश महाराज शेटे (विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष) , हभप रामकृष्ण महाराज अम्बुस्कर (विश्व वारकरी सेना अकोला शहराध्यक्ष),हभप महादेव महाराज निमकांडे (वारकरी संत साहित्य परिषद अकोला जिल्हाध्यक्ष), हभप विठ्ठल महाराज साबळे (विश्व वारकरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष, हभप प्रवीण महाराज कुलट (स्वरसम्राज्ञ अकोला जिल्हाध्यक्ष), हभप शिवा महाराज बायस्कर (विश्व वारकरी सेना अकोला जिल्हाध्यक्ष) , हभप गोदावरीताई बंड ( विश्व वारकरी सेना महिला अकोला जिल्हाध्यक्ष), हभप  सोपान महाराज उकर्डे , विश्व वारकरी सेना अकोला उपजिल्हाध्यक्ष ,हभप विक्रम महाराज शेटे (विश्व वारकरी सेना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष) ,हभप शिवहरी महाराज इस्तापे (विश्व वारकरी सेना बाळापुर तालुकाध्यक्ष), हभप मंगेश महाराज ठाकरे ,विश्व वारकरी सेना अकोट तालुकाध्यक्ष), हभप विजय महाराज राउत (विश्व वारकरी सेना, हभप ज्ञानेश्वर महाराज पातोंड ( स्वरसम्राज्ञ उपजिल्हाध्यक्ष), हभप श्रीधर महाराज तळोकार ( स्वरसम्राज्ञ अकोट तालुकाध्यक्ष), हभप गोपाल महाराज बाहे (विश्व वारकरी सेना मुर्तीजापूर तालुकाध्यक्ष), हभप विलास महाराज कराड, मनोज महाराज टाले आदींची उपस्थिती होते.

टिप्पण्या