Akola crime: खदान व डाबकी रोड हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले

आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा  दाखल करण्यात आला



अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान इन्कम टॅक्स चौकात मोटरसायकलवर अवैधरित्या दारूची वाहतूक करताना आरोपी प्रेम राहुल पावनमारे (वय ३०वर्ष रा गौतम नगर जूना RTO ऑफिस रोड) यास पकडले.  त्याचेकडून देशी दारुच्या बाटल्या 48 नग किंमत 255 रुपये ,एक मोटरसायकल किंमत 60,000 एकूण 62,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


 

आरोपीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा  दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत यशवंत राजू कार्निवाल (रा भांडपुरा नाका) याचेकडून देशी दारूच्या तीन पेट्या किंमत 9000 एक मोटरसायकल 40,000 असा एकूण 49,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 


आरोपीविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आज रविवारी रात्री करण्यात आली.




ही कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व पथकाने केली.

टिप्पण्या