Crime news:लग्नाचे आमिष दाखवून आदिवासी युवतीचे शोषण;आरोपीस अटक

युवतीने लग्न करण्यासबंधी गळ घातली असता, आरोपी निलेश याने नकार दिला. पिडीत युवतीचा नेहमी वाईट उद्देशाने पाठलाग करुन लगट निर्माण केली. 

Accused arrested for sexually abusing a tribal girl


मूर्तिजापूर : शहरातील राणा ले-आउट भागात राहणाऱ्या  ३० वर्षीय युवकाने त्याच भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय आदिवासी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा लैंगिक छळ करुन, अनेक वेळा अती प्रसंग केल्याची तक्रार पिडीतेने २२ रोजी संध्याकाळी शहर पोलीसांत दाखल केली. 


हकीकत अशी की, एमआयडीसी परीसरातील राणा ले-आउट मध्ये राहणाऱ्या निलेश रामराव बलंग (३०) हा पिडीत युवतीचा गत चार वर्षा पासून लग्नाचे आमिष दाखवून उपभोग घेत होता. या युवतीने लग्न करण्यासबंधी गळ घातली असता, आरोपी निलेश याने नकार दिला. पिडीत युवतीचा नेहमी वाईट उद्देशाने पाठलाग करुन लगट निर्माण केली, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अतिप्रसंग केला. आरोपीस वारंवार लग्नासाठी विनवणी करुन सुध्दा  नकार दिला. आरोपीने सातत्याने लैंगिक छळ केला असल्याची तक्रार पिडीत युवतीने दाखल केली आहे. 



तिच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी निलेश बलंग याचे विरुद्ध भादंवि च्या कलम ३७६, ३७६,२, एन ५०६ व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३,(१)(डब्ल्यू) (१,२) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. 

टिप्पण्या