corona update:अकोला:रुग्ण संख्या परत वाढली आज १५ पॉझिटीव्ह अहवाल

               *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि.२७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१०७*  
*पॉझिटीव्ह-१५*
*निगेटीव्ह-९२*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील तीन जण, तेल्हारा, जवाहर नगर, बाळापूर व साखरविरा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर,  राऊतवाडी, रामदासपेठ व जोगळेकर प्लॉट  येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६८५+१४२३+१७७=८२८५*
*मयत-२७४*
*डिस्चार्ज- ७४९९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५१२*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या