corona update: अकोला:आज २०पॉझिटीव्ह;१मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

*आज  रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१०५*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह-८५*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सहा महिला व १४ पुरुषाचा समावेश आहे. त्यातील सुंदर नगर  येथील तीन जण,  रामदास पेठ व जीएमसी  येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित राऊतवाडी, सी. ओ. कॉलनी, मुकुंद नगर, राजांदा, गोरक्षण रोड,  वरखेड बार्शीटाकळी, आर. एस.  हॉस्टेल रेल्वे स्टेशन, जुने शहर, डाबकी रोड, न्यू महसूल कॉलनी, आदर्श नगर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.




दरम्यान आज एक जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण भेंडी महाल, बार्शीटाकळी येथील ५८ वर्षीय पुरुष असून तो दि. २२ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. 




काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.




*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६६९+१४१९+१७७=८२६५*
*मयत-२७१*
*डिस्चार्ज- ७४७४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५२०*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या