Banjaradharmaguru: बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव बापू महाराज यांचे मुंबईत निधन; पोहरादेवी येथे उद्या अंत्यसंस्कार

रामराव महाराज हे १९४८ मध्ये पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते.



वाशिम : पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती, बंजारा समाजाचे  धर्मगुरु, रामराव बापू महाराज यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले.संत सेवालाल महाराज यांच्या कुळातील ते बंजारा धर्मगुरू होते. मुंबईत लीलावती हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.


काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचारही करण्यात आले. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, ३० ऑक्टोबर  रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्यासोबत महंत शेखर महाराज होते. 



रामराव महाराज हे १९४८ मध्ये पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजात अपार श्रद्धा असून, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.







टिप्पण्या