anti-radiation chip: गायीच्या शेणापासून चक्क अँटी रेडिएशन चिप तयार-कामधेनू आयोगाचा दावा

गायीचे शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचे वैज्ञानिक सिद्ध झालेले आहे. गायीच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईल फोन मध्ये सुध्दा वापरता येवू शकते.


नवी दिल्ली: गायीचे महत्त्व भारतीयांना माहीतच आहे. गौमूत्र आणि शेण याचे अनेक फायदे आहेत.औषधी गुणधर्म देखील आहेत,हे सर्व आपल्याला माहीत आहे. परंतू, गायीच्या शेणापासून चक्क अँटी रेडिएशन चिप तयार केली, या गोष्टीवर आपला विश्वास बसणार आहे का, नक्कीच नाही. पण हे शक्य झाले आहे. तयार करण्यात आलेली ही चिप मोबाईल करिता वापरता येणार आहे. तसेच हे आजारां विरोधात ढाल असल्याचा दावा राष्ट्रीय कामधेनू आयोगाने केला आहे.



कामधेनु दीपावली अभियान' चे राष्ट्रव्यापी अभियान निम्मित वल्लभभाई कथीरिया यांनी शेणा पासून बनलेल्या एक चिपचे अनावरण केले. यावेळी त्यांनी हा दावा केला.


कामधेनू आयोगाने गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला. “गायीचे शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेणार. गायीचे शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचे वैज्ञानिक सिद्ध झालेले आहे. गायीच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईल फोन मध्ये सुध्दा वापरता येवू शकते. तसेच आजारां विरोधात हे एक  सुरक्षा कवच आहे,” असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.


कथीरिया यांनी सांगितले की,” गायीच्या शेणापासून रेडिएशन कमी करण्यास मदत होते. ही एक अँटी रेडिएशन चिप आहे. आम्हाला असे दिसून आले आहे की, ही चिप मोबाईलमध्ये ठेवल्यास रेडिएशन कमी होते. तुम्हाला जर आजारांपासून दूर राहायचं असेल, तर याचा वापर करू शकता,” असे ते म्हणाले. या अँटी रेडिएशन चिपचे नाव गौसत्व कवच असून, ही चिप राजकोटमधील श्रीजी गौशाळेत तयार केली,असे कथीरिया यांनी सांगितले


कथीरिया यांनी सांगितले की, ५०० हुन अधिक गौशाळेत अशा प्रकारच्या एंटी-रेडिएशन चिप्स निर्माण कार्य सुरू आहे. एका चिपची किंमत ५९ से १०० रुपये दरम्यान आहे. अमेरिकेत सुध्दा आता निर्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


राष्ट्रीय कामधेनु आयोग (आरकेए) मत्स्य, पशुपालन आणि डेयरी मंत्रालय अंतर्गत येते. केंद्र द्वारा फेब्रुवारी २०१९ ला या आयोगाची स्थापना झाली होती. याचा  उद्देश्य 'गायींचे संरक्षण आणि विकास' आहे. केंद्रीय बजट २०१९-२० मध्ये याची  घोषणा केली होती.

.


टिप्पण्या