Vidarbha Chamber: ऍड. सुभाष ठाकूर व दीपेन शाह यांची विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यकारी सदस्यपदी निवड; रेडक्रॉस तर्फे सत्कार

ऍड. सुभाष ठाकूर व दीपेन शाह यांची विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यकारी सदस्यपदी निवड; रेडक्रॉस तर्फे सत्कार

Adv.  Subhash Thakur and Deepen Shah elected as executive members of Vidarbha Chamber of Commerce;  Greetings from the Red Cross


अकोला,दि.१५: एखाद्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यास इतर संस्थांमध्ये महत्त्वाचे पद मिळणे हीच मूळ संस्थेसाठी अभिमानाची बाब असते असे रेडक्रॉस चे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर मालोकार यांनी सांगितले. 



रेडक्रॉसचे कार्यकारी सदस्य एडवोकेट सुभाषसिंह ठाकूर व दीपेन शाह यांची विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे कार्यकारी सदस्य म्हणून झालेल्या निवडीबद्दल त्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.




रेडक्रॉसच्या कार्यामुळे सामाजिक योगदानाचे कार्य समजले असे गुजराती समाज ट्रस्टचे अध्यक्ष दीपेन शहा यांनी सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले.

लोकोपयोगी कार्य केल्यास सामाजिक संस्था कडून त्यांची दखल घेतली जाते, असे सत्काराला उत्तर देताना एडवोकेट ठाकूर यांनी सांगितले.



शिक्षण तज्ञ प्राध्यापक सत्यनारायण बाहेती व वाशिमचे शिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे यांच्यासह इतर सदस्यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केले.

टिप्पण्या