SSR:बिग ब्रेकिंग: अखेर रिया चक्रवर्तीला अटक...

बिग ब्रेकिंग: अखेर रिया चक्रवर्तीला अटक... 


                                     file photo

मुंबई: सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात  नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) जेव्हापासून तपास सुरू केला आहे, तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे.आज एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा व्यवहार केल्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. 


रविवारी सुरू झालेल्या या चौकशीत एनसीबी रियाला अटक करेल, असें चिन्ह होते. मात्र, रविवार आणि सोमवारी चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे रियाला आज मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आले होते. चौकशीत रियाने कबुली दिल्याने तिला एनसीबीने अटक केली.


रियाची आता मेडिकल आणि करोना टेस्ट केली जाईल.उद्या तिला न्यायालयासमोर हजर केले जाईल.


आतापर्यंत रियाने ती कोणतेही व्यसन करत नसल्याचे सांगितले होते. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचे मान्य केले. ती स्वतः अमली पदार्थांचे सेवन करत नसून फक्त सुशांतसाठी मागवायची असेही तिने आपल्या जबाबात सांगितले.


रियाचा भाऊ शौविक व सुशांतसिंहचा व्यवस्थापक सॅम्युएलचा अंमली पदार्थांशी संबंध असल्याचे याआधीच समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने मुंबईत विविध ठिकाणी छाप्याची कारवाई सुरू केली आहे. 



टिप्पण्या