Corona virus update:आज अकोल्यात दिवसभरात ७६ पॉझिटिव्ह!

आज अकोल्यात दिवसभरात ७६ पॉझिटिव्ह!

*आज  गुरुवार दि. ३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३०१*
*पॉझिटीव्ह-७६*
*निगेटीव्ह- २२५*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व तीन पुरुष  आहे. अकोट फैल, डाबकी रोड, तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज  कोणाचेही अहवाल पॉझिटीव्ह आले नाही. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष असून ते ३१ ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. 


 सकाळच्या अहवालात जीएमसी येथील सहा जण दाखविण्यात आले होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून  रुग्णांच्या पत्या पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात आले आहे : गोरेगाव ता. अकोला, येरंडा ता. बार्शीटाकळी, बाळापूर, उमारी, खेळकर नगर व बोरगाव मंजू येथील आहे. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २३ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १३ जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून तीन जण, आयकॉन  हॉस्पीटल येथून चार जण,  हॉटेल रणजीत येथून ११ जण तर कोविड कोरोना सेंटर, हेडज मुर्तिजापूर येथून तीन जणांना अशा एकूण ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात .




*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३३८१+७५२+९४=४२२७*
*मयत-१६०*
*डिस्चार्ज- ३३४३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७२४* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या