Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ५९ पॉझिटिव्ह; १ मयत

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ५९ पॉझिटिव्ह; १ मयत




*आज  सोमवार  दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२५२*
*पॉझिटीव्ह-५९*
*निगेटीव्ह-१९३* 



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २४ महिला व ३५ पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील १० जण, सिंधखेड, गौरक्षण रोड, विठ्ठल नगर व जीएमसी येथील प्रत्येकी तीन जण, सिंधी कॅम्प, सिव्हील लाईन, वडाळी देशमुख, अकोट, तेल्हारा, शास्त्री नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन जण.



उर्वरित टि फॅक्टरी, पोळा चौक, बोरगाव मंजू, बाळापूर, लहान उमरी, अकोली जहागीर, गोडबोले प्लॉट, गोकूल कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, जोगळेकर प्लॉट, मलकापूर, डाबकी रोड, जठारपेठ, शिवाजी नगर, कपिला नगर, व्यकेटेश नगर, शास्त्री नगर, पिंपरी, धामोरी, भगोरा, सिरसो, निर्सग अर्पाटमेन्ट व गुडधी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जीएमसी, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष असून तो १९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.


दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५९८०+११५३+१५५=७२८८*
*मयत-२२६*
*डिस्चार्ज- ५४३२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १६३०* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या