Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात १९६ पॉझिटिव्ह;१ मयत

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात १९६ पॉझिटिव्ह;१ मयत


*आज गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३२८*
*पॉझिटीव्ह- १९६*
*निगेटीव्ह-१३२*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व २० पुरुषांचा समावेशआहे.  त्यातील देशमुख पेठ लोहार गल्ली येथील सहा जण, डाबकी रोड, जीएमसी व जागृती विद्यालय येथील प्रत्येकी तीन जण, जठारपेठ, चिंतामणी नगर, पारस व मलकापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित एलएच क्वॉटर,  सिंधी कॅम्प, अकोट फैल, गौरक्षण रोड, रामदास पेठ, खडकी, भावसिंग सोसायटी व शनिवार पेठ अंजनगाव सूर्जी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रणपिसे नगर, अकोला येथील ७५ वर्षीय पुरुष  असून तो १४ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू  झाला.



दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२ जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून ३९ जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा जण, ओझोन हॉस्पीटल येथून दोन जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २० जण, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सात जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून दोन जण, कोविड केअर सेंटर,अकोट येथून १० जणांना असे एकूण १०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



 
 *आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५००६+१००२+१५५=६१६३*
*मयत-१९६*
*डिस्चार्ज- ४५९३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१३७४*

टिप्पण्या