corona update: *कोरोना अलर्ट*:Akola: आज ५९ पॉझिटिव्ह; १ मयत

*कोरोना अलर्ट*:Akola: आज ५९ पॉझिटिव्ह; १ मयत

                                      file photo



*आज  रविवार  दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२३२*
*पॉझिटीव्ह-५९*
*निगेटीव्ह-१७३* 


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १५ महिला व ४४ पुरुष आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील १३ जण, अकोट येथील सात जण, छोटी उमरी, डाबकी रोड  व बाळापूर येथील प्रत्येकी तीन जण,  मलकापूर, मोठी उमरी, बोरगाव मंजू, जीएमसी, शास्त्रीनगर व ओझोन येथील प्रत्येकी दोन जण.



उर्वरित जोगळेकर प्लॉट, हिंगणारोड, श्रीवास्तव चौक, डोंगरगाव, गजानन नगर, नानक नगर, कोठारी वाटिका, पत्रकार कॉलनी ,जुनेशहर, पाथर्डी अकोट ,वरुर अकोट, कुटासा, शिवापुर, कानेरी, रंजना नगर, आदर्श कॉलनी, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बोरगांव मंजू येथील ६५ वर्षीय महिला असून ती २४ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.



दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५९००+१११२+१५५=७१६७*
*मयत-२२५*
*डिस्चार्ज- ५३७१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १५७१* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या