- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला जीएमसी अधिष्ठाता यांच्या पतीचे कोरोनाने निधन
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये (७१) यांचे कोरोना विषाणूमुळे आज रविवारी, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले.
डॉ. इंदुप्रकाश हे माजी वैद्यकीय अधिकारी होते. राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी सेवा दिली. वयाच्या ५८ व्या वर्षी नागपूरच्या आयजीएमसीमधून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. मीनाक्षी, मुलगा डॉ. अनुज, मुलगी डॉ.द्रुमदलक असा आप्त परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा